Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणे-नगर शटल रेल्वेसेवेसाठी दिलीप गांधी दिल्लीत रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला

पुणे-नगर शटल रेल्वेसेवेसाठी दिलीप गांधी दिल्लीत रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला

अहमदनगर (प्रतिनिधी) –

नगर-पुणे शटल रेल्वे सुरू होण्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना साकडे घातले

- Advertisement -

आहे. त्यासाठी गांधी हे नवी दिल्लीत पोहचले. या रेल्वेसाठी 13 मार्चला रेलरोको केला जाणार असल्याने गांधी यांनी धावपळ सुरू आहे.

पुणे-नगर शटल रेल्वेसेवे ही नगरकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे मंत्री गोयल यांची भेट घेत एप्रिल पासून ती सुरू करावी अशी मागणी केली. रेल्वे क्रांती आंदोलनासाठी नगरमधील अनेक संघटना एकवटल्या आहेत. 13 मार्चला आंदोलन केले जाणार आहे.

रेल्वे मंत्रीकडून लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी स्पष्ट केले आहे. हे आंदोलन होवू नये आणि शटल सुरू व्हावी यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांची धावपळ सुरू आहे.

अहमदनगर-पुणे (व्हाया काष्टी, केडगाव) रेल्वे कॉड लाईनचे काम पूर्ण झाले आहे. दौंड रेल्वे स्टेशन बाहेरील कॉड लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाल्याने रेल्वे सेवा त्वरित सुरू करता येणे शक्य आहे. मात्र कोरोना महामारीमुळे ही रेल्वेसेवा सुरू होऊ शकलेली नाही. 1 एप्रिल पासून अहमदनगर-पुणे रेल्वे सेवा सुरू करुन नगरकरांना नवीन वर्षाची भेट द्यावी, तसे आदेश सोलापूर रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे खासदार गांधी यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या