नागरी सहकारी बँकांसाठी डिजीटल पेमेंन्ट प्रशिक्षण

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India), मुंबईतर्फे (mumbai) क्षेत्रीय कार्यालयातील पेमेंन्ट ऍण्ड सेटलमेंन्ट सिस्टीम विभागातर्फे (Payment and Settlement System Division) ‘डिजीटल पेमेंन्ट’ (Digital Payment) या विषयावर सभासद नागरी सहकारी बँकांसाठी (Urban Co-operative Banks) प्रशिक्षण शिबीर (Training camp) झाले.

प्रशिक्षण कार्मशाळेचे (Training camp) उद्घाटन नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर (Nashik District Urban Cooperative Banks Association President Vishwas Thakur) यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी डिजीटल पेमेंन्टचे (Digital Payment) महत्व व डिजीटल पेमेंन्ट करत असतांना घेण्याच्या दक्षता याबाबत बँकांबरोबर सर्व सामान्य नागरिकांनीदेखील सावध राहीले पाहिजे व नवनवीन तंत्रज्ञान बँक कर्मचार्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे ठाकूर म्हाणाले.

मार्गदर्शक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राहुल कुमार, अमोघावर्षा टी.एच., सागर निकम यांनी डिजीटल पेमेंन्ट एन.ई.एफ.टी, आर.टी.जी.एस, नेट बँकींग, मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस, युपीआय पेमेंन्ट, भारत बिल पेमेंन्ट सिस्टीम, फास्टटॅग, ई-रूपीव्दारे व्यवहार करतांना घ्यावयाच्या दक्षता त्यातून उद्भवणार्या समस्या,

फसवणूकीचे (Fraud) प्रकार, सायबर क्राईम (Cybercrime) त्या संदर्भात तक्रार कुठे करायची व त्याचे निराकरण कसे करावे. या विषयावर अतिशय विस्तृत विवेचन केल. शिबीरास जिल्ह्यातील ३८ सभासद नागरी सहकारी बँकांचे ७३ प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे व्यवस्थापक रामलाल सानप यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *