Friday, April 26, 2024
Homeनगरदिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… जयघोषात दत्त जयंती साजरी

दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… जयघोषात दत्त जयंती साजरी

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी )

‘दिगंबरा.. दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा..’ च्या जयघोषात शेवगाव येथील दादाजी वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थानात दत्तजयंती भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रात्री उशिरापर्यंत रीघ सुरू होती.

- Advertisement -

सकाळी मंगलमय वातावरणात सद्गुरु श्री दत्तात्रेयांच्या मनोहरी संगमरवरी मूर्तीवर साधक व दत्त भक्तांच्या वतीने पंचसूक्त पवमान अभिषेक घालण्यात आला सामूहिक मंत्र पठणानंतर दत्तयागाची पूर्णाहुती झाली. शैलेश जोशी, राहुल जोशी, श्रीपाद बिडेकर. तुकाराम चिक्षे आदी ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले. योगेश तायडे यांनी दत्तगुरूंची विविध पानाफुलांनी आकर्षक पूजा बांधली.

दुपारी टाळमृदंगाच्या निनादात दिमाखदार पालखी सोहळा संपन्न झाला. पाना फुलांनी सजविलेल्या पालखीत दत्तात्रेयांची उत्सवमूर्ती व श्री गुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ ठेवण्यात आला होता. सायंकाळी दयानंद महाराज कोरेगावकर यांचे दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. यावेळी सनातन संस्था प्रकाशित ‘ योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे अध्यात्मिक बोधामृत ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. दत्तजयंतीचे औचित्य साधून गणेश गायकवाड(बीड) यांनी २५ किलो वजनाच्या दोन पितळी समया श्रीदत्त चरणी अर्पण केल्या.

याप्रसंगी शरद वैशंपायन, ललिता वैशंपायन, रवींद्र पुसाळकर, वृषाली पुसाळकर, अतुल पवार, प्रा.के. एल. पवार, निला जोंधळे, पूजा रानडे आदी ज्येष्ठ साधक उपस्थित होते. गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके व सचिव फुलचंद रोकडे यांचे नेतृत्वाखाली सेवाभावी कार्यकर्त्यांनी उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.दत्त जन्मोत्सवाच्या पाळण्याची दोरी ओढल्यानंतर महाआरती झाली. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या