Monday, April 29, 2024
Homeनगरसाठ्यात तफावत आढळलेल्या नेवाशातील दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा प्रस्ताव

साठ्यात तफावत आढळलेल्या नेवाशातील दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा प्रस्ताव

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात आतापार्यंत दोन कृषि केंद्रांमध्ये पॉस मशिनवरील साठा आणि गोदामातील साठा यामध्ये तफावत आढळून आलेली असून सदर कृषि केंद्रांवर कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे व पंचायत समितीचे कृषि अधिकारी प्रताप कोपनर यांनी दिली.

- Advertisement -

खरीप 2022 ची तयारी कृषि विभागाकडून जोरदार सुरू आहे. खताचा पुरेशा साठा खरीप हंगामात उपलब्ध होण्याच्या दृष्टिने खताचा साठा खत नियंत्रण प्रणालीवरून म्हणजेच पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशिन वरून कमी करण्यासाठी कृषि विभागाने प्रथम प्राधान्याने लक्ष देत आहे. जिल्हयात खत नियंत्रण प्रणालीनुसार पॉस मशिनवर 64 हजार 488 मेट्रीक टन साठा आज रोजी शिल्लक आहे. जिल्हयातील 14 तालुक्यांपैकी नेवासा तालुक्यात 6824 मेट्रीक टन साठा शिल्लक आहे. पॉस मशिनवरील साठा आणि गोदामांतील साठा सारखा करण्याकरीता कृषि विभागाकडून संयुक्त कृषि तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

ऐन हंगामाच्या तोंडावर कृषि केंद्रांवर कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. पॉस मशिनवर जास्तीचा साठा शिल्लक राहील्यास तालुक्यासाठी खरीपामध्ये आवंटन मिळणार नाही, त्यामुळे खताचा पुरवठा होणार नाही. खताचा तुटवडा होण्यास पॉस मशिनवर खताचा साठा ठेवणारे कृषि केंद्रचालक जबाबदार असणार आहेत. त्यामुळे अशा केंद्रांवर कारवाईचा बडगा कृषि विभागाकडून उगारला जाणार आहे. संयुक्त तपासणीची मोहीम नियमीतपणे चालू राहणार असल्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. डमाळे यांनी सागीतले आहे.

मृदा परिक्षणानुसार खत मात्रांच्या शिफारशीनुसार खतांचा वापर करावा, सरळ खतांचा वापर जसे युरीया आणि सिंगल सुपर फॉस्फेट सारख्या खतांचा वापर वाढविण्याचे असे अवाहन देखील कृषि विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या