Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकचेहर्‍यात तफावत, मग परीक्षा नाही!

चेहर्‍यात तफावत, मग परीक्षा नाही!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा देताना कदाचित विद्यार्थ्यांना स्टायलिश लूक अडचणीचा ठरू शकतो.

- Advertisement -

कारण परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र आणि परीक्षेपूर्वी वेबकॅमद्वारे दिसणारा चेहरा यात जर तफावत आढळली तर परीक्षा देता येणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या संदर्भात नियम आणले आहेत.

विद्यापीठाने परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी अधिक कठोर नियमांचा पर्याय स्वीकारला असून विद्यार्थ्याचे ओळखपत्र आणि परीक्षेपूर्वी वेबकॅमद्वारे विद्यार्थ्याचा ‘चेहरा’ जुळणे आवश्यक आहे.

चेहरा जुळण्यास अडचणी आल्यास परीक्षा देता येणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या हॉल तिकिटावरच परीक्षेसाठीचे यूजर नेम व पासवर्ड राहणार आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांची चेहरा पडताळणी केली जाईल. हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अपलोड करायचे आहे. या फोटोची साइज ‘शंभर केबी’ इतकीच असावी.

विद्यापीठाने परीक्षेसाठी तयार केलेली ई-प्रणाली दोन्ही चेहरे तपासेल त्यामुळे ओळखपत्र जोडतानाच विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी. स्पष्ट चेहरा दिसेल अशा स्वरूपात परीक्षेला बसावे, यासह विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ संपण्यापूर्वीच सबमिट बटणावर क्लिक करणे अनिवार्य आहे.

सोप्या प्रश्नांसाठी ‘बुकमार्क’!

अनेकदा सोपे प्रश्न सोडविण्यास विद्यार्थी प्राधान्य देतात. हीच सोय ऑनलाइन परीक्षेतही उपलब्ध आहे. लॉगिन केल्यावर विद्यार्थ्यांना स्क्रीनवर बुकमार्कचा पर्याय दिसेल. त्यातून अपेक्षित प्रश्न क्रमांक निवडून उत्तर नोंदवता येईल.

हे लक्षात घ्या…

परीक्षेवेळी वेबकॅमद्वारे फोटो काढले जातील.

विद्यार्थ्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आल्यास ताकीद देण्यात येईल.

विद्यार्थ्याला परीक्षा देताना एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जाता येणार नाही.

कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करणे, अन्यथा आजूबाजूने एखादी व्यक्ती जाणे गैर असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या