Saturday, May 11, 2024
Homeनगरडिझेल चोरणारे दोन जण वैजापूर पोलिसांनी पकडले

डिझेल चोरणारे दोन जण वैजापूर पोलिसांनी पकडले

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

शहरातील बजरंग चौक ते खान गल्ली रस्त्यावर डिझेल चोरी (Diesel Theft) करण्याच्या उद्देशाने आलेले दोघे चोरटे वैजापूर पोलिसांनी (Vaijapur Police) पकडले. त्यांच्याकडून 5 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

- Advertisement -

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

शहरातील खान गल्ली ते बजरंग चौक या रस्त्यावर रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास डिझेल चोरी (Diesel Theft) करण्याच्या उद्देशाने आलेल्या अमोल अविनाश कुंदे (वय 19, रा. एकरुखा, ता. राहाता, जि. अहमदनगर) व सोमनाथ ज्ञानेश्वर बोर्डे (वय 25, रा. चिकटगांव, ता. वैजापुर, (ह.मु. हजार रूम मागे हाऊसिंग सोसायटी शिर्डी, जि. अहमदनगर) या आरोपीना पोलिसांनी अटक (Accused Police Arrested) केली.

त्यांच्या ताब्यातून पाच लाख रुपये किंमतीची एक पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार (क्र. एमएच. 05 सीए 4321) तसेच आरोपी अमोल अविनाश कुंदे याच्या ताब्यातून एक निळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, आरोपी सोमनाथ बोर्डे याच्या ताब्यातून व्हीवो कंपनीचा रंगाचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 5 निळ्या रंगाचे प्लॅस्टिक कॅन यासह डिझेल चोरी (Diesel Theft) करण्यासाठी वापरात येणारे साहित्य जप्त केले.

पोलीस कॉन्स्टेबल महेश बिरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध वैजापूर पोलिसात (Vaijapur Police) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. डी. एस. शिंदे करीत आहेत.

दरोड्याच्या तयारीत असलेली सहा दरोडेखोरांची टोळी जेरबंद‘लव्ह जिहाद’ दोन आरोपी अद्याप पसारच

- Advertisment -

ताज्या बातम्या