Wednesday, April 24, 2024
Homeधुळेपोपटराव सोनवणे हे स्वयंघोषीत विरोधी पक्षनेते

पोपटराव सोनवणे हे स्वयंघोषीत विरोधी पक्षनेते

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेमध्ये विरोध पक्षनेता हे पदच अस्तित्वात नाही. सदस्य पोपटराव सोनवणेे स्वत:च हे पद लावून मिरवतात,…

- Advertisement -

असे सांगतांनाच त्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी आज पत्रपरिषदेत केले. आम्हाला कोणालाही ग्रामविकास मंत्र्यांची अथवा कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचे देखील ते म्हणाले.

दोन दिवसांपुर्वी जि.प.सदस्य पोपटराव सोनवणे यांनी जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांबाबत पत्र परिषद घेवून माहिती दिली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह 13 सदस्यांना आपले सदस्यत्व रद्द का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले होते. यावर आज अध्यक्ष डॉ. रंधे यांनी पत्रपरिषद घेवून या आरोपांचे खंडण करतांनच श्री. सोनवणे यांचा समाचार घेतला. ते म्हणालेत मुळातच जिल्हा परिषदेमध्ये विरोध पक्षनेता असे कोणतेही पद नाही. मात्र श्री. सोनवणे स्वयंघोषीत नेतापद लावून मिरवित आहेत.

जि.प.ची प्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, मुळातच जिल्हा परिषद 17 जानेवारी रोजी अस्तित्वात आली. त्यात मार्चपासून कोविड 19 या आजाराने देशभरात थैमान घातल्याने लॉकडाऊन सुरु झाले.

कर्मचारी संख्येवर, सभांवर मर्यादा आल्यात. परिणामी बहुतांश विकास कामांचे विषय, रखडलेले विषय यांना अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयात मंजूरी देण्यात आली.

श्री. सोनवणे यांनी म्हटलेली स्थायी सभा 30 मार्च रोजी झालेलीच नाही. तसेच टाकरखेडा ते आरावे या रस्त्याच्या सुधारणेचा विषयच अजेंड्यावर नाही. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांना खोटी माहिती दिली आहे.

शासकीय नियम व प्रशासकीय मान्यता, ई निविदा या पध्दतींचा अवलंब करुनच काही कामांना मंजूरी देण्यात आली आहे. 30 एप्रिल, 29 मे यावेळी झालेल्या स्थायी सभांमध्ये नियमानुसारच कामांना मंजूरी दिली आहे.

11 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नियमाला आदिन राहून कामे मंजूर करण्यात आली तर ठराव क्र. 41 नामंजूर करण्यात आला. ठराव क्र. 53, 54 प्रशासकीय मान्यतेसाठी राखून ठेवण्यात आले.

ठराव क्र. 55 अन्वेय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील 232 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी निविदा प्रक्रिया कोविड 19 चा प्रादूर्भाव लक्षात घेवून जिल्हा स्तरावर राबविण्याची शासनास विनंती करणारा ठराव करण्यात आला. असेही डॉ. रंधे म्हणाले.

या पत्रपरिषदेला प्रा. अरविंद जाधव, कामराज निकम, बापू खलाणे, राम भदाणे यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या