Friday, April 26, 2024
Homeधुळेकरोनाबाबत नियमांचे उल्लंघन,शंभर जणांवर गुन्हा

करोनाबाबत नियमांचे उल्लंघन,शंभर जणांवर गुन्हा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरात काल काढण्यात आलेल्या रॅलीत जमाव जमवून करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींग, मास्क न लावणे या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रॅली आयोजकांसह 75 ते शंभर जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. आहे.

- Advertisement -

पुणे करार स्मृती दिनानिमित्त अनुसुचीत जाती व जमाती आर्थिक प्रमाणबध्द बजेट शंभर टक्के लागु करणे, कंत्राटी कामगारांवर होणारे शोषण थांबवावे, या मागण्यांसाठी काल दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे आनंद लोंढे यांच्यासह पधरा जण व इतर 75 ते 100 जणांनी रॅली काढली.

विद्यावर्धिनी कॉलेज परिसरातुन काढलेल्या या रॅलीत एकत्र जमान जमवून कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे व आदेशाचे सोशल डिस्टन्सिंगचे व मास्क न लावणे, अशा आदेशाचे उल्लंघन केले. तसेच घोषणाबाजी व निदर्शने केली.

याबाबत हेकॉ.सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून आनंद लोंढे यांच्यासह जिल्हाध्यक्ष विजय सावकारे, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष शिंदे, मोहन गुलाब, नईम कुर्शीद अहमद, इम्रान भिका पठाण, कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रविण पाटील, उत्तर महाराष्ट अध्यक्ष भालचंद्र दिलीप सोनगत, दिपेंद्र शांताराम जगताप, वाहतुक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जितुभाऊ जगताप, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम शिकलीकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा महासचिव दिनेश गांगुर्डे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष कल्पेश गोसावी, रवी नगराळे, मोहन गुलाब व इतर 75 ते 100 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असई.बडगुजर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या