Saturday, April 27, 2024
Homeधुळेसाडेतीन लाखांची गायछाप लंपास

साडेतीन लाखांची गायछाप लंपास

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील अवधान शिवारातील दोन गोडावून चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडलीस आली.

- Advertisement -

एका गोडावूनमधून चोरट्यांनी साडे तीन लाखांचे गायछापचे पोते लंपास केले. तर दुसर्‍या गोडावूनमधून ड्रायफ्रुटचे लांबविले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अवधान शिवारात उदय पेट्रोल ंपंपच्या मागे बुर्‍हाणी यांच्या मालकीचे गोडावून पारस शितल जैन (वय 49 रा. गल्ली नं. 5, मिरच्या मारूती चौक, राणा भवन समोर, धुळे) यांनी भाड्याने घेतले आहे. त्यांनी त्यांनी गायछाप, चॉकलेट व कुरकर्‍यांचे बॉक्स असा माल ठेवलेला होता.

दि. 27 रोजी सायंकाळी ते दि. 28 रोजी पहाटे साडेतीन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या लोखंडी शटरची पट्टी ओढून आत प्रवेश केला.

3 लाख 51 हजार रूपये किंमतीचे गायछापचे 68 पोते लंपास केले. तसेच शेजारील प्रभात ट्रेडर्सचे मालक विक्की कैलास अग्रवाल याचे गोडावूनही चोरट्यांनी फोडले आहे. तेथून ड्रायफ्रुटचे पोते चोरून नेले आहेत.

याप्रकरणी पारस जैन यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटे जवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता राऊत यांच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने महामर्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या