Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळे : श्री राम मंदिरात खासदारांच्या उपस्थितीत महाआरती

धुळे : श्री राम मंदिरात खासदारांच्या उपस्थितीत महाआरती

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महाराष्ट्र्रात आज पासून मंदिरे सुरू झाल्याने धुळ्यातही भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. येथील जुन्या आग्रा रोड वरील श्री राम मंदिरात सकाळी महा आरती करण्यात आली.

राज्यात मदिरालये सुरू झालीय पण मंदिरे बंद होते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

- Advertisement -

हिरामण गवळी

यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे, मंदिर ट्रस्ट चे अजय नाशिककर,भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक हिरामण गवळी यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.

तसेच खानदेश चे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिशक्ती एकविरा माता मंदिरातही महाआरती झाली.

मंदिर ट्रस्ट चे मुख्य विश्वस्थ सोमनाथ गुरव यांनी या निर्णयाचे स्वागत केले. भाविकांमध्ये कमालीचा उत्साह जाणवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या