Monday, April 29, 2024
Homeधुळेयुवकाची पट्ट्याने गळफास घेवून आत्महत्या

युवकाची पट्ट्याने गळफास घेवून आत्महत्या

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील दिवानमळा येथील युवकाने गावाबाहेरील नाल्यातील झाडाला स्वतःच्या पट्टयाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल पहाटे उघडकीस आली. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

बारकु पोपट बागुल (वय 18 रा. दिवानमळा, वरची भिलाटी ता. धुळे) असे मयत युवकाचे नाव आहे. तो दि. 13 रोजी सायंकाळी स्वतःचा मोबाईल चार्जींगला लावून कोणाला काही न सांगता बाहेर निघून गेला.

रात्रीही जेेवणाला घरी आल्याने कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा गावासह परिसरात रात्रभर शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही.

काल सकाळी सहा वाजेच्या सुमारास एकाला गावातील ग्रामपंचायत विहिरीच्या बाजुला असलेल्य नळीच्या नाल्यात एका पळसाच्या झाडाला कोणीतरी गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यामुळे तो आरडाओरड करत गावात आला. सरपंच व ग्रामस्थांना घटनास्थळी जावून पाहीले असता मयत हा बारकु बागूल असल्याचे दिसून आले. त्याने स्वतःच्या कमरेच्या पट्टयाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

याबाबत मनसिंग रतन बागुल यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या