Saturday, April 27, 2024
Homeधुळेलाचखोर ग्रामसेविका अडकली जाळ्यात

लाचखोर ग्रामसेविका अडकली जाळ्यात

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

गावात केलेल्या कामाचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून 16 हजारांची लाच घेणार्‍या ग्रामसेविकेला रंगेहात पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे एसीबीच्या पथकाने ही सापळा कारवाई केली.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील सोनेवाडी गावात तक्रारदार खाजगी ठेकेदाराने दोन घरकुल, सात शौचालय व भूमिगत गटारीचे बांधकाम केले होते. या बांधकामाचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेविका पुनम प्रकाश ठाकरे (वय 30 ) यांनी ठेकेदाराकडे 16 हजार रुपये लाचेची मागणी केली.

त्यामुळे ठेकेदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज गावात सापळा लावला.

ग्रामसेविका पुनम ठाकरे यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करून 16 रूपये लाच स्विकारल्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तालुका पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या