Friday, April 26, 2024
Homeधुळेकत्तलीला घेवून जाणार्‍या 45 बैलांची सुटका

कत्तलीला घेवून जाणार्‍या 45 बैलांची सुटका

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

ट्रकमधून राजस्थानमधून मालेगावकडे कत्तलीच्या उद्देशाने घेवून जाणार्‍या 45 बैलांची शिरपूर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे.

- Advertisement -

हाडाखेड चेक पोस्टवर सापळा रचून ट्रकला पकडण्यात आले. ट्रकसह 45 बैल असा एकुण 18 लाख 15 हजारांचा मुद्येमाल जप्त कण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

पथकाने हाडाखेड चेकपोस्टवर सापळा रचून ट्रकला (क्र. आरजे 09 जीसी 7230) पकडले. ट्रकची तपासणी केली असता दोन कप्प्यामध्ये तब्बल 45 बैलांना दोरीने बांधून कोंबलेले दिसून आले.

15 लाखांचा ट्रक व 3 लाख 15 हजार रूपये किंमतीचे 45 बैल असा एकुण 18 लाख 15 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

तर चालक उस्मान खाँ मोहम्मद हनिफ खॉ (रा. दाऊदखेडी जि. मनसोर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने बैल राजस्थान येथून मालेगाव येथे घेवुन जात असल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोना संजीव जाधव यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या