Friday, April 26, 2024
Homeधुळेअज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा

अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील निमगुळ येथील दोन वर्षीय बालिकेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

त्यानुसार कोणत्या तरी कारणावरून अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण करून तिला विहिरीत फेकुन खून केला आहे.

त्यानुसार गुन्ह्यात भादंवी 302 वाढीव कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी मारेकर्‍यांचा कसुन शोध सुरू केला असून यासाठी सायबर सेलची देेखील मदत घेतली जात आहे.

निमगुळ येथील रहिवासी प्रविण रामराव सैंदाणे (वय 29) यांची दोन वर्षाची मुलगी प्राची हिचा काल सकाळी गावाबाहेरीत विहिरीत मृतदेह आढळून आला होता.

प्राची ही कुुटुंबियांसह घरात झोपलेली होती. त्यादरम्यान अज्ञात इसमाने दरवाजाला असलेल्या दोरीने बांधलेली खाट बाजुला सरकावून घरात प्रवेश करून बालिकेला उचलून घेवून गेला.

काल दि. 18 रोजी सकाळी निमगुळ गाव शिवारातील ललितकुमार प्रेमनारायण पाटील (रा.वेल्हाणे ता. पारोळा जि. जळगाव) यांच्या शेतातील विहिरीत बालिकेचा मृतेदह आढळून आला. त्यामुळे तिचा कोणीतरी खुन केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

रात्री उशिरा तिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरूण तिचे अपहरण केले. त्यानंतर विहिरीत फेकुन तिचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात भांदवि 302 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.

दरम्यान पोलिसांनी बालिकेच्या कुटुंबियांना तुमचे कोणाशी भांडण झाले होते का, काही जुना वाद होता का, कोणावर संशय आहे का, अशी विचारपुस केली आहे. त्यानुसार गुन्ह्याचा तपास केला जात आहे. याबरोबरच मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात असून घटनेच्या मध्यरात्रीपासून घटनास्थळी अ‍ॅक्टीव्ह असणार्‍या मोबाईलचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या