Friday, April 26, 2024
Homeधुळेआरोपीची माहिती देणार्‍यास 25 हजारांचे रोख बक्षिस

आरोपीची माहिती देणार्‍यास 25 हजारांचे रोख बक्षिस

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील निमगुळ येथील दोन वर्षीय बालिकेच्या खुनाचा गुन्था अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे तालुका पोलिसांनी

- Advertisement -

अज्ञात आरोपीची माहिती देणार्‍यास रोख 25 हजारांचे बक्षिस जाहिर केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव देखील गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

निमगुळ येथील रहिवासी प्राची प्रविण सैंदाणे (वय 2) ही बालिका घरात आई-वडिलांजवळ झोपलेली असतांना तिला दि.17 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेच्यादरम्यान अज्ञात इसमाने घरात प्रवेश करुन अपहरण करून केले. तसेच निमगुळ शिवारातील विहिरीत फेकुन तिचा खुन केला आहे.

दि. 18 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीविषयी कोणाला काही माहिती मिळुन आल्यास किंवा काही माहिती असल्यास त्यांनी तालुका पोलिसांना माहिती द्यावी.

मुलीचे अपहरण करणार्‍या इसमाविषयी उपयुक्त माहिती (नाव व पत्ता) ज्यांनी दिली त्यांना पोलिसांतर्फे रोख 25 हजार रूपये बक्षीस देण्यात येईल.

माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या