Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेवून पोलिसात हजर होणार

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेवून पोलिसात हजर होणार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

आपण नुसते त्यांच्या फार्म हाऊसचे अतिक्रमण बघण्यासाठी आणि तेथे काय चालते याची खात्री करण्यासाठी जाताच रावलांनी एवढा थयथयाट केला.

- Advertisement -

यावरुन गेले 15 वर्ष या मतदार संघात त्यांची किती व कशी गुंडगीरी व दंडेलशाही सुरु आहे. याचा अंदाज येवू शकतो. असे सांगून एवढे घाबरण्याचे कारण काय? असा सवाल माजी आ. अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी श्री. गोटे यांच्यावर दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्यांनी माजीमंत्री आ. रावल यांच्या टाकरखेडा येथील फार्म हाऊसमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करुन तेथील कर्मचार्‍यांशी गैरवर्तण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आज श्री. गोटे यांनी पत्रक प्रसिध्दीस देवून उद्या दि. 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता आपण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे एक हजार कार्यकर्ते घेवून दोंडाईचा पोलिस ठाण्यात हजर होणार असल्याचे म्हटले आहे.

आम्ही दोन हजार कार्यकर्ते घेवून दोंडाईचा पोलिस ठाण्यात येवू असे पत्र भाजपच्यावतीने जिल्हा पोलिस प्रशासनाला देण्यात येवून गोटेंना अटक करा असे म्हटले आहे.

आपल्या एकाच किरकोळ झटक्याने रावल इतके घाबरण्याचे कारण काय? असा सवालही श्री. गोटे यांनी उपस्थित केला आहे. खरेतर मी अटक होण्यासाठीच जातो आहे, एवढेही त्यांना कळू नये, असेही गोटेंनी पत्रकात नमूद केले आहे.

आपल्याला उभ्या आयुष्यात कधी पोलिसांची चाटूगिरी करण्याची गरज भासली नाही. भविष्यातही करणार नाही. ज्याच्या मनगटात जोर नसतो त्यालाच एवढी हुजरेगिरी करावी लागते. आपण भाजपात असतांना देखील थेट मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतले होते.

स्वाभिमानाने एकवर्ष आधीच आमदारकीचा राजीनामा दिला. अर्थात स्वाभिमान काय असतो हे तुम्हाला काय कळणार, असे सांगत माझ्या उर्मटपणाची तुम्ही चिंता करु नका असेही गोटेंनी या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या