धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी असा रंगणार सामना

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई :

करोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची (Dhule-Nandurbar local body constituency)निवडणूक जाहीर झाली आहे. मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. गेल्या १ एप्रिलला ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती.

निवडणूक स्थगित झाली तेव्हा भाजपतर्फे अमरीश पटेल यांनी, तर काँग्रेसकडून अभिजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. याच दोघा उमेदवारांमध्ये आता निवडणूक होणार आहे.

अमरीश पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची आहे. तर काँग्रेससाठीही महत्वाची आहे. कारण सध्या काँग्रेस सत्तेत आहे. तर भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच चर्चा आहे.

कधी होणार मतदान?

मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी मंगळवारी १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून गुरुवारी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट आहे. महाविकास आघाडीतर्फे अभिजीत पाटील यांना जागा देण्यात आली आहे. तर भाजपकडून अमरीश पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *