Wednesday, May 8, 2024
Homeधुळेमहापालिकेत कामगारांना स्वच्छतेचे धडे

महापालिकेत कामगारांना स्वच्छतेचे धडे

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महापालिकेतील स्वच्छता निरिक्षक, मुकादम व सफाई कामगारांना

- Advertisement -

स्वच्छतेचे धडे देणयात आले. धोकेदायक ड्रेनिज व सेफ्टीटँक स्वच्छता करण्याबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

धोकेदायक ड्रेनिज व सेफ्टीटँक स्वच्छ करतांना अडचणी येतात. याबाबत महापालिकेत स्वच्छता निरिक्षक, मुकादम आणि सफाई कामगार यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेला आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्याधिकारी डॉ.मोरे आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत भुयारी गटारींचे चेंबर, धोकेदायक ड्रेनिज आणि सेफ्टीटँक यांची स्वच्छता कशी करावी यावेळी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

चेंबरची स्वच्छता करतांना अगोदर चेंबरमधील ऑक्सीजनची तपासणी करावी. त्यानंतर सेफ्टीटँक स्वच्छता करण्यासाठी उतरावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या