Tuesday, April 23, 2024
Homeधुळेचिखलीतील अट्टल गुन्हेगार धुळ्यात गजाआड

चिखलीतील अट्टल गुन्हेगार धुळ्यात गजाआड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील चित्तोड रोडवरील संभाप्पा कॉलनीतील घरफोडीचा तपास करतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चिखलीतील अट्टल गुन्हेगाराल पकडले आहे.

- Advertisement -

त्यांच्याकडून घरफोडीतील मुद्येमाल व गुन्हात वापरलेली दुचाकी असा एकुण 1 लाख 41 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्हेगारासह त्यांच्या साथीदारावर महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल 86 गुन्हे दाखल आहेत.

शहरातील संभाप्पा कॉलनीतील रहिवासी संगिता उमाकांत चौधरी यांच्याकडे दि. 3 सप्टेंबर रोजी भरदुपारी दोन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी केली केली होती. घरातून 22 ग्रॅमचे सोन्याची मंगलपोत चोरून नेली होती.याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. त्यादरम्यान हा गुन्हा किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने केला असून तो साक्री रोडवर फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महिंदळे शिवारात सापळा रचून किशोर वायाळ यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 21 ग्रॅम 880 मिली वजनाची सोन्याची मंगलपोत व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 41 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल त्याच्या गुन्ह्यातील साथीदार राजेंद्र सोनू भोसले याने देऊळगाव राजा येथील एका घरून चोरलेली असल्याचे कबुल केले आहे. तसेच त्याने जालना, बुलडाणा, बीड जिल्ह्यात दिवसा घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

आरोपी किशार तेजराव वायाळ व त्याचे साथीदार हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचे एकूण 46 गुन्हे व गुजरात राज्यात चोरी व घरफोडीचे एकूण 40 गुन्हे असे एकूण 86 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशि. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उप निरीक्षक- हनुमान उगले, पोहेकॉ. रफीक पठाण, श्रीकांत पाटील, पोना. प्रभाकर बैंसाणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, राहुल सानप, विशाल पाटील यांनी केली असून उर्वरीत आरोपीचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या