Friday, April 26, 2024
Homeधुळेव्हॉट्सअ‍ॅपवर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र टाकून मुलीने दिला धक्का

व्हॉट्सअ‍ॅपवर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र टाकून मुलीने दिला धक्का

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या तरूण मुलीने सायंकाळी व्हॉट्सअ‍ॅपवर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र टाकले. व चिठ्ठीही पाठविली.

- Advertisement -

अचानक घडलेल्य या प्रकारामुळे कुटुबियांना एकच धक्का बसला. नंतर तिचा फोनही नॉट रिचेबल आला. त्यामुळे कुटुंबियांच्या माहितीवरून शहर पोलिसात मिसिंगची नोंद झाली आहे.

वृषाली संजय नजान (वय 21 रा. विखेनगर, चित्तोड रोड, धुळे) असे व्हॉट्सअ‍ॅपवर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र टाकून बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे.

वृषाली ही दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरून नेहमी प्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामावर गेली. सायंकाळी सहा वाजता तिची मोठी बहिण तेजस्विनी हिने तिला फोन केला.

तु स्वयंपाक करणार आहे का मीच करून घेवून, अशी विचारणा केली. त्यावर वृषालीने तु स्वयंपाक कर मी उद्या करेल, असे सांगितले.

त्यानंतर सात वाजता वृषालीने व्हॉट्सअ‍ॅपर थेट तिचे विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे फोटो पाठविले. सोबत चिठ्ठी पाठविली.

त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तिला फोन लावला. मात्र तो बंद आला. त्यामुळे वृषालीच्या वडीलांनी शहर पोलिस ठाणे गाठत माहिती दिली.

त्यानुसान मिसींगची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना एस.व्ही. पाठक हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या