Tuesday, April 23, 2024
Homeधुळेछत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेस तडा जावू नये

छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेस तडा जावू नये

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या संतप्त भूमिका घेणारे खा.संभाजी राजे भोसले यांना माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांनी संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमिकेस तडा जाणार नाही, अशी सूचना केली आहे.राजर्षी शाहू महाराज यांची नात पद्माराजे कदमबांडे यांचे राजवर्धन हे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.

कोल्हापूर घराण्याशी थेट संबंध असल्याने माजी आ.कदमबांडे यांनी खा.संभाजी राजे यांना सूचना केली आहे.

आपल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. स्वतः छ.शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते.

त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे व ठोस कायदेशिर घटनात्मक तरतूद असणारे आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र हे करीत असतांना इतर बहुजन, ओबीसी, मागास समाजाच्या हिताचे आरक्षण व त्यांचे रक्षण करावयाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणून आपली सर्वांची आहे.

मराठा समाजासाठी काम करत असतांना शाहू महाराजाबद्दल इतर समाजामध्ये असलेल्या आदराच्या भावनेस तडा जाणार नाही याची खा.संभाजी राजे यांनी काळजी घ्यावी असेही कदमबांडे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या