Friday, April 26, 2024
Homeधुळेबनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त

बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राज्य उत्पादन शुल्क विभाग व मोहाडी पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे अन्वर नाला भागातील एक बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त करुन त्या ठिकाणाहून दोन लाख आठ हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान

- Advertisement -

पथकाने छापा टाकला त्यावेळी संशयित फरार झाला. त्याचा शोध घेतला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला अन्वर नाल्या शेजारी दारुचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने आज दि. 6 ऑक्टोबर रोजी छापा टाकला.

त्यावेळी तेथे बनावट दारुचा कारखाना आढळून आला. पथकाने कारखाना उद्ध्वस्त केला. व त्या ठिकाणाहून दोन लाख आठ हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोनशे लिटर क्षमतेच्या दोन प्लॅस्टीक ड्रममध्ये विदेशी मद्य तयार केलेले आढळून आले. तसेच तीन हजार 700 रुपये किंमतीची 35 लिटर क्षमतेची प्लॅस्टीक कॅन स्पिरीटने भरलेले, दोनशे लिटर क्षमतेचा रिकामा स्पिरीट वासाचा ड्रम, तीनशे आणि 180 मिलीच्या काचेच्या रिकाम्या विदेशी मद्याच्या 150 बाटल्या, 500 बुच, ड्रममधून स्पिरीत काढण्यासाठी एक लोखंडी मशीन असा दोन लाख आठ हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पथकाने कारवाई केली त्या दरम्यान संशयीत पळून गेला. त्याच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई निरीक्षक बी.एस.महाडीक, अमोल पाटील, तुषार देशमुख, बी.आर.नवले, एस.आर.नजन, ए.बी.निकुंबे, जवान आर.एन.सोनार, ए.व्ही.भडागे, के.एम. गोसावी, जितू फुलपगारे, डी.बी.पावरा, गोरख पाटील, वाहन चालक व्ही.बी.नाहीदे, एन.डी.मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, निरीक्षक एन.आर.मिर्झा, जवान गणेश भामरे, कांतीलाल शिरसाठ, देवा वाघ, धिरज गवते, जितू वाघ, अश्विनी गरुड यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरिक्षक अमोल हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या