Friday, April 26, 2024
Homeधुळेजिल्हास्तरीय युवा महोत्सव यंदा ‘ऑनलाइन’

जिल्हास्तरीय युवा महोत्सव यंदा ‘ऑनलाइन’

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाइन होणार्‍या जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी 23 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

- Advertisement -

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे 15 ते 29 वर्षांखालील वयोगटातील युवक- युवतींच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून संधी मिळावी म्हणून जिल्हास्तरीय युवा महोत्सव साजरा केला जातो.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाइन होणार असून स्पर्धेसाठी स्वतंत्र लिंक तयार करण्यात येईल. तसे स्पर्धकांना कळविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी प्रकार असे (अनुक्रमे प्रकार, सहभाग संख्या आणि वेळ मिनिटांमध्ये या क्रमाने)- लोकनृत्य, 20, 15. लोकगीत, 6, 7. एकांकिका (इंग्रजी, हिंदी), 12, 45. शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी), 1, 15. शास्त्रीय नृत्य, 1, 15. सीतार, 1, 15. बासरी, 1, 15. तबला, 1, 10. वीणा, 1, 15. मृदंग, 1, 10. हार्मोनियम (लाइट), 1, 10. गिटार, 1, 10. मणिपुरी नृत्य, 1, 15. ओडिसी नृत्य, 1, 15. भरत नाट्यम, 1, 15. कथ्थक, 1, 15. कुचीपुडी, 1, 15. वक्तृत्व, 1,4.

महोत्सवाच्या नियम व अटी- सर्व कला प्रकारात सहभागी होणार्‍या युवक- युवती कलाकारांचे वय 15 वर्षे पूर्ण व 12 जानेवारी 2020 रोजी 29 वर्षाखालील असावे. वयाबाबतच्या अधिकृत दाखला प्रवेश अर्जासमवेत जोडणे आवश्यक राहील.

स्पर्धक हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी असावा. त्यासाठी रहिवास दाखला जोडावा. अन्यथा प्रवेश नाकारण्यात येईल. ज्या बाबींना साथ संगत आवश्यक आहे. त्या कलावंतांना वयोमर्यादा लागू राहणार नाही. एकांकिकामध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शक सुध्दा 15 ते 29 वर्षे वयोगटातील असावेत.

ओडिसी, भरतनाट्यम, मणिपुरी, कथ्थक, कुचीपुडी नृत्य सादर करणार्‍या कलाकारांना पूर्व मुद्रित ध्वनिफिती (कॅसेट/सीडी) कार्यक्रम सादर करता येईल.

लोकनृत्य व लोकगीत या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असावीत. सहभागी कलाकारांनी आवश्यक असणारे साहित्य स्वत:च्या जबाबदारीवर आणावे. युवा महोत्सवाच्या दरम्यान येणार्‍या तक्रारीचे निवारण जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती करेल.

सर्व स्पर्धकांना परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. परीक्षकाबाबत कुठलाही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धा कलाकाराबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह पाचशे रुपये भरुन त्या ठिकाणी आक्षेप सिध्द करावा लागेल.

सर्व कलाकारांनी स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य (उदा. वादन सामग्री, मेकअप, ड्रेस आदी) स्वतः करावयाचे आहे. युवा महोत्सवातील संख्या ही साथसंगत देणार्‍यासह असल्यामुळे वेगळी साथसंगत घेता येणार नाही. रंगभूषा व वेशभूषा व साहित्य कलाकारांना स्वत: करावयाचे आहे. कोणतेही साहित्य संयोजकामार्फत पुरविले जाणार नाही. पार्श्वगायन असणार्‍यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या