Thursday, April 25, 2024
Homeधुळेस्कॅनिंग यंत्रणा दहा दिवसांत कार्यान्वित करा

स्कॅनिंग यंत्रणा दहा दिवसांत कार्यान्वित करा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंगची यंत्रणा आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँक दहा दिवसांत कार्यान्वित करून अहवाल सादर करावा.

- Advertisement -

कोरोना विषाणूविषयी अफवा पसरविणार्‍यांविरुध्द गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल , जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण, डॉ. शिवचंद्र सांगळे, शशांक काळे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. सत्तार म्हणाले की, कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करावेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. अति जोखमीच्या रुग्णांवर तातडीने उपचारासाठी अँटिजेन चाचण्या वाढवाव्यात असे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार करतानाच संभाव्य रुग्ण वाढीचे नियोजन आतापासून तयार ठेवावे. ते करतानाच नॉन कोविड रुग्ण व प्रसूतीसाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करावी. त्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घ्यावी.

याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी चर्चेअंती निर्णय घ्यावा, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या