Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे जिल्हाधिकारी संजय यादव कोरोना बाधीत

धुळे जिल्हाधिकारी संजय यादव कोरोना बाधीत

धुळे | दि.१ | प्रतिनिधी Dhule

जिल्हाधिकारी संजय यादव यांची कोरोना विषाणूच्या रॅपिड अँटिजेंन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५७४९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७४१ रुग्ण सक्रिय आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्स पाळावे. कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना काहीबेफिकिरने वागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही गोष्ट योग्य नाही.असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कोविड केअर सेन्टर सुरू केले आहेत. औषधे पुरेशी आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही.

माझी कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या