Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळ्यात डेंग्यू व मलेरिया सदृष्य परिस्थिती निर्माण

धुळ्यात डेंग्यू व मलेरिया सदृष्य परिस्थिती निर्माण

धुळे – Dhule- प्रतिनिधी :

शहरात डेंग्यु व मलेरिया सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे डास नियंत्रणासाठी मलेरिया विभागातर्फे फॉगिंग व अ‍ॅबेटींग कामाबाबत आराखडा तयार करण्यात यावा. व त्यानुसार नियोजन करावे. अशी सूचना महापालिका स्थायी सभापती सुनिल बैसाणे यांनी केली.

- Advertisement -

आरोग्य विभागाची आढावा बैठक श्री. बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला उपायुक्त शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना बैसाणे म्हणाले की, शहरात डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होत असून याच काळात साथ रोगांची संख्या वाढते. शहरात गेल्यावर्षी डेंग्यु व मलेरियाने थैमान घातले होते.

त्यामुळे आतापासून ठोस कार्यवाही करावी. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कचरा हा घंटा गाडीतच टाकावा. परिसरात कचरा फेकून पेटवून देतात असे निदर्शनास येते.

कचरा जाळल्याने प्रदूषण वाढते त्यामुळे नागरिकांनी कचरा घंटा गाडीतच टाकावे. घंटागाड्यांचे नियोजन प्रशासनाने करावे, शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर होवू नये यासाठी योग्य नियोजन करावे. अशी सूचनाही त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या