Friday, April 26, 2024
Homeधुळेगुंगीकारक औषधाच्या बाटल्यांसह तरूणाला पोलीसांनी घेतले ताब्यात

गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांसह तरूणाला पोलीसांनी घेतले ताब्यात

धुळे – प्रतिनिधी dhule

शहर पोलिसांच्या (police) पथकाने संतोषी माता चौकात छापा टाकत गुंगीकारक औषधाच्या (anesthetic drug) बाटल्यांसह तरूणाला जेरबंद केले. त्यांच्याकडून बाटल्यांसह एकुण 27 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

Video सातपुडा पर्वत रांगेतील निंबा देवी धरण ‘ओव्हर फ्लो’

याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात संतोषी माता चौकात पहाटेच्या वेळी अजुरुद्दीन शेख रफियोद्दीन शेख हा एका बॅगमध्ये डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन शिवाय गुंगीकार नशा येणार्‍या औषधाचे बाटल्यांचा साठा चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन असल्याची गुप्त शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे पाच वाजता संतोषी माता चौकात सापळा रचला.

संशयीत तरूण दिसताच त्याला छापा टाकुन पकडले. त्याने त्याचे नाव अजुरुद्दीन शेख रफियोद्दीन शेख (वय 21 रा. भोला बाजार, एैंशी फुटी रोड, धुळे) असे सांगितले. त्याच्याकडून (Hydrochloride) हायड्रोक्लोराईड लाईन्सतूस नावाच्या गुंगीकारक औषधाच्या 199 बाटल्या, एक मोबाईल व एक बॅग असा एकुण 27 हजार 60 रूपयांचा मुद्येमाल जप्त केला.

या गुंगीकार औषधाच्या बाटल्यांबाबत त्याच्याकडे कोणतीही खरेदी पावती किंवा डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन मिळून आली नाही. त्याने चौकशीत या बाटल्या मिनाबाई (रा.जामचामळा, शंभर फुटी रोड, धुळे) हिच्या असल्याचे सांगितले. त्यांच्या विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण पाटील (Superintendent of Police Pravin Patil), अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav), उपविभागीय पोलिस अधिकारी.

कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि दादासाहेब पाटील, पोउनि दत्तात्रय उजे, पोहेकॉ सुभाष मोरे, दिनेश परदेशी, पोना गौरव देवरे, विशाल सुर्यवंशी, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, केतन पाटील, किरण भदाणे, मनिष सोनगीरे, प्रविण पाटील, गुणवंत पटाईत यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या