Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील जिल्हा रुग्णालयासाठी आमदार फारूक शाह यांनी स्थानिक विकास निधीतून 30 लाखांच्या

- Advertisement -

2 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहे. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आ. फारूक शाह व आई हज्जन साबेराबी, आदिल कलीम शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिका अत्यंत गरजेची होती. सुरवातीच्या काळात रुग्णांना किवा शव वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हत्या.

त्यामुळे स्थानिक विकास निधीतून जिल्हा रूग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्याचे आ. शाह यांनी ठरविले होते. त्यानुसार रूग्णवाहिका दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही रुग्णवाहिका कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी उपयोगात येणार आहेत.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. महेश भडांगे, अधिपरिचारिका प्रतिभा घोडके, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक नासिर पठाण, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समसूल हुदा, शहराध्यक्ष नूरा शेख, महिला अध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, डॉ. बापूराव पवार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या