भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी आशुतोष पाटील

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी आशुतोष विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ते राज्यातील सर्वांत कमी वयाचे जि.प. सदस्य आहेत.

पक्ष मजबूत करणार भाजपाची विचारसरणी, ध्येय- धोरणे ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याबरोबरच, युवकांचे विधायक विचारांचे संघटन उभारुन पक्ष मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे.

आशुतोष पाटील

नियुक्ती पत्र आशुतोष पाटील यांना नुकतेच प्राप्त झाले. गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी दिलेले योगदान, तसेच युवकांचे संघटन पाहता ही जबाबदारी देवून सन्मानीत करण्यात येत असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

धुळे ग्रामीण जिल्ह्यातील युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबुत करण्यासाठी आपण येत्या काळात अथक परिश्रम घेवून ही जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडाल असेही या पत्रात म्हटले आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील हे शिरुड गटाचे जि.प.सदस्य तसेच शिरुड येथील श्री. कालिका विद्या प्रसारक संस्थेचे सचिव या पदावर सध्या कार्यरत आहेत. अंगी युवा नेतृत्व गुण असलेल्या आशुतोष पाटील यांनी जिल्ह्यात युवकाचे मोठे संघटन उभे केले आहे.

आशुतोष पाटील यांना ज्येष्ठ नेतृत्व गजानन नारायण पाटील व अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणुन ओळख असलेले विजय गजानन पाटील यांच्याकडुन समृध्द राजकीय व सामाजिक वारसा लाभला आहे.

आशुतोष पाटील यांनी वयाच्या 24 व्या वर्षी भाजपाच्या तिकीटावर जि.प. सदस्य म्हणून निवडून आले आहेत, सबंध महाराष्ट्रात युवकांतून कमी वयाचे जि.प. सदस्य म्हणुन त्यांनी नावलौकीक मिळविला आहे.

भाजपा पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची तसेच युवा संघटनाची दखल घेत आशुतोष विजय पाटील यांची भाजयुमो जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीबद्दल खा.सुभाष भामरे, आ.जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पाटील, ज्येष्ठ नेते गजानन नारायण पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, बाजार समितीचे चेअरमन सुभाष देवरे, बाजार समितीचे संचालक विजय गजानन पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव, कामराज निकम, सचिव भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुमताई कामराज निकम, कृषी सभापती बापु खलाणे, मंगलाताई पाटील, सभापती धरती देवरे, मोगराताई पाडवी यांनी अभिनंदन केले आहे.