Thursday, April 25, 2024
Homeधुळेबालाजींच्या मूर्तीचे पदस्पर्श

बालाजींच्या मूर्तीचे पदस्पर्श

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

बालाजींच्या मूर्तीला पदस्पर्श करुन भाविकांनी एकदशीच्या दुसर्‍या दिवशी बालाजींचे आज दर्शन घेतले.

- Advertisement -

दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. भाविकांच्या दर्शनानंतर बालाजींच्या मूर्तीचा अभिषेक करुन मूर्ती मंदिरात स्थानपन्न करण्यात आली.

येथील बालाजींचा रथोत्सव पाशांकुशा एकादशीला साजरा केला जातो. त्यानंतर बालाजींच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर वर्षातून एक वेळेस बालाजींच्या मूर्तीला भाविकांना पदस्पर्श करता येते.

पुन्हा बालाजींच्या मूर्तीला अभिषेक घालून मूर्ती स्थानपन्न करण्यात येते. भाविकांनी कोरोना संकट झुगारुन आज बालाजींचे दर्शन घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या