समाजवादी पार्टीतर्फे आत्मदहनाचा प्रयत्न

jalgaon-digital
1 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे नॉन कोवीड सेंटर व प्रसुती विभाग सुरु करण्यात यावा ,

यासाठी आज समाजवादी पार्टीतर्फे नगरसेवक अमीन पटेल यांच्यासह 17 जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न असफल ठरला.

हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे नॉन कोवीड सेंटर व प्रसुत विभाग सुरु करण्याबाबत समाजवादी पार्टीतर्फे अनेकवेळा निवेदने देण्यात आली.

आंदोलनही करण्यात आले. परंतु दखल घेण्यात आली नाही. सद्यस्थितीत हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे कोवीड सेंटर सुरु केले आहे.

त्यामुळे येथे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना जवाहर मेडिकल कॉलेज येथे पाठविले जाते. परंतु ज्या महिलांजवळ योजनेचे कार्ड किंवा रेशनकार्ड नाही त्यांना पैसा मोजावा लागतो.

काहींची परिस्थिती नसल्याने खर्च करणे शक्य नाही. तसेच प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला व बाळाला कोरोना तपासणीसाठी पाठवावे लागते. त्यामुळे सदर महिलेला अनेक अडचणींना सामोजारे जावे लागते.

त्यामुळे हिरे वैद्यकीय महविद्यालयात नॉन कोवीड सेंटर व प्रसुती विभाग सुरु करावा यासाठी आज समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, रफीक शाह गुलाब शाह, इनाम सिद्दीकी, गुलाम कुरेशी, अकिल अन्सारी, निहाल अन्सारी, इरफान शाह, सलीम चमडेवाले, अकिल शाह, कलीम कुरेशी, रशिद शाह, नवाब खाँन, सादीज मक्कु, रमजान पहेलवान, सलिम टेलर, अप्पू अन्सारी, नवीद अन्सारी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी प्रयत्न हाणून पाडला. यामुळे पुढील अनर्थ टळला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *