Friday, April 26, 2024
Homeनगरधुम स्टाईलने सोन्याचे गंठण पळवले

धुम स्टाईलने सोन्याचे गंठण पळवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी (Savedi) उपनगरात चेन स्नॅचिंगच्या (Chain Snatching) घटना सुरुच असून आणखी एका महिलेचे दीड तोळा वजनाचे सोन्यांचे मिनीगंठण (Gold Chain) मोटारसायकलवर भरधाव वेगात आलेल्या दोन चोरट्यांनी हिसका मारुन तोडून पळविल्याची घटना पद्मावती चौक येथील डी-मार्ट समोर घडली आहे. याबाबत प्रियंका केदारी (वय 37, रा. विजयनगर, बोल्हेगाव फाटा) यांनी शुक्रवारी (दि.14) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

एक रुपयात पिकविमा तरीही शेतकर्‍यांचा सहभाग कमी

फिर्यादी केदारी या जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिका असून त्या पती व दोन मुलांसह गुरुवारी (दि.13) रात्री चारचाकी वाहनाने सावेडीच्या पद्मावती चौकात असलेल्या डी-मार्ट मॉलमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करुन झाल्यावर रात्री 9.15 च्या सुमारास त्या मॉलमधून गाडीकडे पिशवी आणण्यासाठी गेल्या. गाडीतून पिशवी घेवून त्या पुन्हा मॉलकडे जाण्यास निघाल्या असता भिस्तबाग चौकाकडून एका मोटारसायकलवर 2 इसम आले.

त्यांनी केदारी यांच्याजवळ येवून मोटारसायकलचा वेग कमी केला आणि मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने केदारी यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण हिसका मारुन तोडले व भरधाव वेगात दोघेही नगर-मनमाड रोडकडे पसार झाले. दोन्ही चोरटे अंदाजे 20 ते 25 वयाचे असून त्यांनी अंगात काळे जर्कीन घातलेले होते. असे केदारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीरामपुरातील फुड कॅफेत अश्लिल चाळेपैसे घेवून बनावट पदव्या देणारे ‘रॅकेट’

- Advertisment -

ताज्या बातम्या