Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकधोडप किल्ल्याचा पुनर्विकास करणार : चौधरी

धोडप किल्ल्याचा पुनर्विकास करणार : चौधरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील चांदवड ( Chandwad ) येथील सातमाळ डोंगररांगेतील ( Satmal Mountain Range ) ऐतिहासिक महत्व असलेला, निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि आपल्या शौर्याची व पराक्रमाची यशोगाथा ताठ मानेने सांगणार्‍या धोडप किल्ल्याची ( Dhodap Fort ) पडझड झाल्याने दुर्लक्षित झाला आहे.

- Advertisement -

अपुर्‍या सुविधांअभावी पर्यटन बंद आहे,ते त्वरीत सुरू करुन पर्यटकांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray )यांनी सूचना केल्याने शिवसेना संपर्क नेते भाऊसाहब चौधरी ( Bhausaheb Chaudhary- Shivseana )यांनी किल्ल्याला भेट देत पहाणी केली. लवकरच याबाबतचा अहवाल ठाकरेंना सादर करुन पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.

धोडप किल्ला पेशवेकालीन आहे.किल्ल्यावरील वेश,तटबंदी महाल, बुरुज यांची मात्र मोठी पडझड झाली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख तथा चांदवडचे भुमिपुत्र भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत धोडप किल्ल्यावर पाहणी केली. इतका उत्कृष्ट किल्ला पण तितकाच दुर्लक्षित हा किल्ला चढून गेल्यावर भाऊसाहेब चौधरी व सहकार्यांनी शिवमंदिराचे दर्शन करुन संपूर्ण किल्ल्यावर फेरफटका मारला. बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहेत, गोड्या पाण्याच्या विहिरी मातीने बुजल्या आहेत, दगडातील पाण्याच्या टाकींची दुरवस्था झालेली आहे.

गडाच्या पायथ्यापर्यंत पक्क्या रस्त्याची गरज आहे. माहितीच्या आधारे खोदकाम केल्यास पुरातन वस्तू जगासमोर येतील, झाडांच्या मुळ्या तटबंदीमध्ये घुसुन भक्कम तटबंदीला तडे गेलेले आहे.अशा अनेक समस्यांची नोंद करण्यात आली आहे.या प्रश्नांची मांडणी पर्यटन विभागाकडे करुन तातडीने विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. यावेळी पर्यटकांनी सुध्दा या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरवस्थेसाठी हळहळ व्यक्त केली. शिवसेनेच्या माध्यमातून किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवणे, पायवाटा झाडे- झुडपे तोडुन मोकळ्या करणे, तसेच पायथ्याशी असणारे हट्टी गाव येथील पर्यटन विभागाचे केंद्र आहे. जे बंद अवस्थेत असल्याने त्याची सुधारणा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येईल असेही चौधरी यांनी सांगितले.

यावेळी त्याचे समवेत चांदवडचे उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, उपतालुकाप्रमुख संतोष मोहन व स्थानिक नागरिक शिवसैनिक होते.

धोडप किल्ल्याचा पायथ्याशी हट्टी येथील पर्यटन केंद्र , गडाकडे येणारे रस्ते, पायवाटा यांचा विकास करण्यासाठी व गडाची पुरातत्व खात्याकडून डागडुजी करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. त्याच अनुषंगाने आज सहकार्‍यांसह किल्ल्यावर जाऊन संपूर्ण पाहणी केली. लवकरच शिवसैनिकासह जाऊन स्वच्छता करणार आहोत.

भाऊसाहेब चौधरी,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख

- Advertisment -

ताज्या बातम्या