Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनVisual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

Visual Story : …म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

सध्या सर्वत्र धर्मवीर मु. पो. ठाणे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

शिवसेना ठाणे जिल्ह्यात वाढविण्यासाठी आनंद दिघे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आनंद दिघे हे कायम पुढे असायचे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दिघे यांचा दबदबा होता.

- Advertisement -

एक दिवस एक महिला त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आली. पतीच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या महिलेला पिठाची गिरणी सुरु करायची होती. मात्र त्या महिलेला कोणीच मदत करायला तयार नव्हते. तेव्हा आनंद दिघे यांनी त्या महिलेला मदत करायचे ठरवले.

आनंद दिघेंनी महिलेला तुमची समस्या काय आहे? असे विचारले. महिलेने आपली समस्या दिघे यांना सांगितले. त्यानंतर दिघे यांनी महिलेच्या परिसरातील नगरसेवकाला बोलावले आणि विचारले. तुम्ही या महिलेला ओळखता का?

त्यावर नगरसेवक बोलला, या महिला कुठल्यातरी कामासाठी माझ्याकडे आल्या होत्या. यानंतर दिघे यांनी त्या नगरसेवकाच्या कानाखाली वाजवली. महिलेला मदत केली नसल्याने दिघे चांगलेच संतापले होते.

त्यानंतर महिलेला तातडीने मदत मिळाली आणि महिलेची पिठाची गिरणी सुरु झाली. आनंद दिघे यांचे असे बरेच प्रसंग आहेत. असेच काही प्रसंग धर्मवीर या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

नुकतेच या चित्रपटातील गुरुपौर्णिमा हे गाणे प्रदर्शित झाले आहे. १३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या