Friday, April 26, 2024
Homeनगरस्वस्त धान्य दुकानात तांदळाऐवजी गहू वाढवा

स्वस्त धान्य दुकानात तांदळाऐवजी गहू वाढवा

धनगरवाडी |वार्ताहर| Dhangarwadi

राहाता तालुक्यातील धनगरवाडी, वाकडी, चितळी या गावामध्ये रेशन दुकानांमध्ये पूर्वी मोफत धान्य माणसी 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ असे पूर्वीचे धान्य प्रमाण होते. परंतु आता 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ मिळतो. मागील वाटप जसे चालू होते तसेच वाटप चालू करावे, अशी मागणी रेशन कार्डधारकांनी केली आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे विकत धान्य अंत्योदयसाठी प्रतिकार्ड 25 किलो गहू व 10 किलो तांदूळ मिळत असे परंतु आता 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ मिळतो. ऑगस्ट महिना संपत आला आहे तरी अजून जून महिन्याचे धान्य वाटप चालू आहे. शासनाने गहू धान्याचे प्रमाण कमी केले आहे. तसेच वारंवार सर्व्हर ऑनलाइन अडचणीमुळे ग्राहकांना जास्त वेळ थांबून राहावे लागते. त्यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी कार्डधारकांमधून होत आहे.

शासनाने पूर्वीप्रमाणे मोफत धान्याची वाटप मागील जशी चालू होती तशी चालू ठेवावी, अशी मागणी विष्णू राशिनकर, नामदेव राशिनकर, भाऊसाहेब साखरे, राजू लांडे, विजय झनान, केरू रक्टे, विलास मंडलिक, निवृत्ती भुसारी, सदाशिव राशिनकर, बबन रक्टे, गोपीनाथ खरात, अर्जुन खरात, म्हसू गायकवाड इत्यादी कार्डधारकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या