Thursday, April 25, 2024
Homeनगरधनगर समाज आक्रमक, आजपासून तीव्र आंदोलन

धनगर समाज आक्रमक, आजपासून तीव्र आंदोलन

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

छत्रपती संभाजी महाराज नगर येथे मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे चौंडी येथे गेल्या अकरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी आले होते. मात्र, जोपर्यंत धनगर आरक्षणावर तातडीने धनगड बांधव व संबंधित अधिकारी व मंत्री यांची बैठक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच रहाणार असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, आज सोमवार (दि.18) पासून धनगर समाज बांधव राज्यभर आपल्या आंदोलनाची धार तीव्र करणार आहे. रविवारी धनगर समाजाच्या 20 ते 22 संघटनांची चोंडी याठिकाण बैठक होवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे उपोषण करणार्‍यांपैकी सुरेश बनडगर यांची तब्येत खालावली असून त्यांच्यावर आंदोलनस्थळी उपचार करण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील त्यांनी आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत यशवंत सेनेच्या वतीने उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे बारा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. सरकारकडून तोडगा निघत नसल्याने उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहेत. शनिवारी रात्री औरंगाबादहून नगरकडे येत आसताना मंत्री गिरीश महाजन यांनी उपचार सुरू असलेल्या व चौंडी येथील उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्याची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यानंतर रात्री आठ वाजता ते चौंडी येथिल उपोषण स्थळी पोहचले व धनगर बांधवांशी चर्चा केली. धनगर समाजाच्या बांधवांनी ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याशी बोलताना सांगितले, की धनगर समाज 2014 मध्ये मोठ्या अपेक्षेने भाजपसोबत राहिला आहे. आता 11 दिवसांपासून चौडी येथे आरक्षणासाठी उपोषण चालू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले आहे, तरीही सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही. एका प्रकारे सरकारकडून धनगर समाजाची कुंचबना करण्यात येत आहे. आरक्षणाअभावी धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी मंत्री महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपोषणकर्त्यांची फोनद्वारे संवाद साधून दिला. फोनवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी उपोषणकर्त्यांशी बोलताना सांगितले, दोन दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर बांधव, संबंधित अधिकारी व मंत्री यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ. यासाठी आपण सर्वजण मंबई येथे यावे. त्याठिकाणी सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करुन मार्ग काढू. तुम्हाला आश्वासन देऊन फसवायचे नाही, धनगर समाजाला आरक्षण दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले.

दरम्यान, रविवारी आंदोलन सुरू होते. चोंडी येथील राज्यातील धनगर समाजच्या 20 ते 22 संघटनांसह 6 ते 7 हजार समाज बांधव याठिकाणी हजर होते. राज्य सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. आरक्षणासाठी मागणीसाठी आंदोलन आता आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी रास्तारोकोसह रेल रोको करण्याची सुचना मांडण्यात आली. जोपर्यंत धनगर समाज बांधव तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार नाही, तोपर्यंत सरकारचे लक्ष जाणार नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यासाठी आज (सोमवार) पासून धनगर समाज बांधव आंदोलनाची धार वाढणार आहेत. यावेळी माजी खा. विकास म्हात्मे, आ. राम शिंदे, आ. दत्तात्रय भरणे, रामहरी रुपनर, गणेश हाके यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

सातार्‍यात 20 तारेखला आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील गावी जाणार्‍या खंबाटाकी घाटात 20 तारखेला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. चोंडी येथील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसांत कोकाणात जाणार्‍या रस्ते मार्ग आणि रेल्व मार्ग अडवण्याच्या तयारी धनगर समाज बांधव आहेत. यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या