Saturday, April 27, 2024
Homeनगर‘धनगंगा’च्या व्यवस्थापकाकडून 48 लाखांचा अपहार

‘धनगंगा’च्या व्यवस्थापकाकडून 48 लाखांचा अपहार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेत तारण असलेली मालमत्ता बनावट दाखला तयार करून तिची विक्री करून

- Advertisement -

तसेच सोन्याच्या कर्जाबाबतही अपहार करून तब्बल 48 लाख 60 हजार 287 रुपयांचा अपहार घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे (रा.घुलेवाडी) याने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2020 या काळात हा गैरव्यवहार केला. त्याने पतसंस्थेत तारण असलेली मालमत्ता विकून 46 लाख 47 हजार 307 व सोने तारण कर्जाबाबत अपहार करून 2 लाख 12 हजार 980 असा एकूण 48 लाख 60 हजार 280 रुपयांचा अपहार केला.

लेखा परीक्षणात हा अपहार सिद्ध झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने कवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लेखापरीक्षक अजय राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कवडे यांच्याविरुद्ध भादंवि. कलम 408, 420, 467, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या