Monday, April 29, 2024
Homeनगरधांदरफळ बुद्रुक पाणीपुरवठा योजनेसाठी 16 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर

धांदरफळ बुद्रुक पाणीपुरवठा योजनेसाठी 16 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावासाठी महूसल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेकरिता 16 कोटी 79 लाख 83 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जि. प. सदस्य रामहरी कातोरे व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध योजना राबवल्या आहेत. संगमनेर तालुक्यात तळेगाव, निमोण, राजापूर, पानोडी यांसह अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. धांदरफळ बुद्रुक या गावची लोकसंख्या जास्त असून या गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी जि. प. सदस्य रामहरी कातोरे, ग्रामपंचायत व धांदरफळ बुद्रूक येथील विविध कार्यकर्ते यांनी नामदार बाळासाहेब थोरात व इंद्रजीत थोरात आणि यशोधन कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

नामदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळात पाठपुरावा करून पुरवठा करून धांदरफळ बुद्रुक गावासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेतून 16 कोटी 79 लाख 83 हजार रुपयांचा निधी मिळविला आहे. याकामी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांनी या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र नामदार बाळासाहेब थोरात यांना मुंबई येथे सुपूर्त केले. या निधीमुळे धांदरफळ बुद्रुक गावात पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या