स्वयंपाक करत नाही, दारु पिते म्हणून पतीने पत्नीला दिला गळफास

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR

दारु पिते, स्वयंपाक करत नाही व काम करत नाही या कारणावरुन पतीने पत्नीला टेंभूर्णीच्या झाडाला गळफास देवून मारुन टाकल्याची घटना उमराणीचा काल्लेखेतपाडा ता.धडगाव येथे घडली. याबाबत पतीविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांन दिलेल्या माहितीनुसार, उमराणीचा काल्लेखेतपाडा येथील मिना रामदास पावरा (३३) ही दारु पिते, घरातील कामे करत नाही व स्वयंपाक करीत नाही या कारणावरुन तिचा पती रामदास सरदार पावरा याने त्याच्या शेतात तीला टेंभूर्णीच्या झाडाला गळफास देवून मारुन टाकले.

याबाबत सपना सुकलाल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामदास सरदार पावरा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेलीस उपनिरीक्षक डी.के.महाजन करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *