Friday, April 26, 2024
Homeनगरपोलीस महासंचालकांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

पोलीस महासंचालकांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल आणि नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर शनिवारी जिल्हा दौर्‍यावर होते.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक उपस्थित होते.

पोलीस महासंचालक हे शिर्डी येथे आल्यानंतर त्यांनी नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढाव घेत सूचना केल्या. जिल्ह्यातील खून, दरोडे, लुटमारीच्या घटना, पसार आरोपींचे प्रमाण, प्रलंबित गुन्हे, अर्ज याबाबत महासंचालक जयस्वाल व महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी आढावा घेत काही सूचना केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणामुळे महासंचालक यांचा जिल्हा दौर्‍याला महत्व आले आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरोड्यांच प्रमाण वाढलं आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी दोन दिवसापूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती ना. निलम गोर्‍हे यांनी महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्याकडे पत्र पाठून केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर महासंचालक यांनी बैठक घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या