Saturday, April 27, 2024
Homeनगरअकोले : देवठाण गाव पाच दिवस बंद

अकोले : देवठाण गाव पाच दिवस बंद

देवठाण | वार्ताहर | Devthan

अकोले तालुक्यातील देवठाण येथे करोनाने कहर केला आहे. दोन दिवसात ७ जण बाधित रुग्ण मिळून आल्याने गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय देवठाण करोना समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

- Advertisement -

करोना बाधित आढळलेला परिसर सील केला असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना तपासण्यात आले आहे. त्यातील २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. करोना समितीच्या बैठकीला सरपंच, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या