Friday, April 26, 2024
Homeनगरदेवराई खून प्रकरणातील 10 जणांना अटक

देवराई खून प्रकरणातील 10 जणांना अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील देवराई विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या वादातून विजयी पॅनलच्या मिरवणुकीवरच हल्ला करत एकाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.18) सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली होती. यातील 10 जणांना विविध ठिकाणावरून पोलीसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

अजय गोरक्ष पालवे(रा. देवराई, ता. पाथर्डी) असे मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या घटनेत मनोहर पालवे,विष्णु पालवे व वैभव पालवे हे गंभीर जखमी आहेत. जखमीवर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनतंर पाथर्डी पोलिसांनी दीड तास थरारक पाठलाग करुन दहा जणांना नेवासाफाटा येथुन ताब्यात घेतले. तिघांना देवराई येथुन ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देवराई विकास सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक झाली सायंकाळी मतमोजणी होवुन श्री बालाजी शेतकरी विकास मंडळ विजयी झाले. सायंकाळी विजयी मिरवणुक चालु होती. निवडणुकीमध्ये पराभुत झाल्याच्या कारणांवरुन संशयितांनी पुर्वतयारीने फिर्यादी व मिरवणुकीतील लोकांवर अचानकपणे तलवार, सुरा, लोखंडी कुर्‍हाड, लाकडी दांडा, काठया घेवुन यांनी हल्ला केला.

यात अजय गोरक्ष पालवे यांच्यावर अनिल एकनाथ पालवे यांने इतरांनी तलवारीने पाठीमागुन उजवे बाजुने बरगडीमध्ये जोरात खुपसुन आरपार घालुन गंभीर ठार मारलेे. मनोहर यास तलवारीने दोन्ही हातावर कु-हाडीने वार केले. विष्णु पालवे यांच्या डोक्यात, वैभव पालवे यांच्या डोक्यात, तलवार व लाकडी दांडाने मारहाण करुन गंभीर जखमी केलेे. संकेत पालवे यांस लाकठी काठीने मारहाण करुन मुक्का मार दिलो. इतरांनी मिरवणुकीवर दगड फेक करुन शिवीगाळ व दमदाटी केली.

गंभीर जखमी अजय पालवे याचा नगरला उपचारासाठी घेवुन जाताना मृत्यु झाला. मनोहर पालवे,विष्णु पालवे व वैभव पालवे हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.वरील सोळा जणाविरुद्ध सर्व रा.देवराई ता.पाथर्डी जि.अ.नगर यांच्या विरुद्ध खुन ,खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन गंभीर जखमी करणे, शिवीगाळ मारहान व खुनाची धमकी, देणे,शस्त्र अधिनियम 25( 4) महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

घटनेनंतर संशयित अनिल पालवे व त्याचे पाच साथीदार असे सहा जण तिसगाव वरुन फाँर्च्युनर गाडीतुन पळुन जात पोलीस पथकांनी त्यांचा पाठलाग सुरु केला.पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व त्यांचे सहकारी यांनीही मिरीकडे जाऊन पाठलाग सुरु केला. पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांनीही संशयीतांचा पाठलाग सुरु केला. पाथर्डी, सोनई, नेवासा येथील पोलिसांनी सुमारे दीड तास पाठलाग केला. नेवासाफाटा येथे पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. रविवारी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी दिवसभर काही संशयीतांचा शोध घेत होते. घटनेनंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर दोन ते अडीचतास रस्तारोको अंदोलन केले. या प्रकरणी पोलीसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

देवराईत तणाव

रविवारी (दि.19) दुपारी अजय पालवे याच्यावर देवराईत तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे यांच्यासह काही राजकीय मंडळी देखील यावेळी उपस्थित होते. शनिवारी रात्रीपासूनच देवराईत पोलिसांची एक तुकडी ठाण मांडून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या