Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : देवपूर गाव १४ दिवसांसाठी बंद

सिन्नर : देवपूर गाव १४ दिवसांसाठी बंद

पंचाळे | Panchale

सिन्नर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतेच देवपूर येथील…

- Advertisement -

एका ५१ वर्षीय महिलेचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव १७ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिन्नर पासून देवपूर २२ किलोमीटर अंतरावर असून अद्याप या गावामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. परंतु चार दिवसापूर्वी येथील एका महिलेचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला.

दरम्यान प्रतिबंधक समितीने याबाबत उपाययोजना करण्यासाठी तातडीने बैठक घेत संपूर्ण गाव १४ दिवस लॉक डाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लॉक डाऊन कालावधीत दवाखाने व मेडिकल सुरू राहणार आहे. ग्रामपंचायतीने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले असून त्या ठिकाणी प्रतिबंध क्षेत्राचा बोर्ड लावून सदर रस्ता रस्त्यावर दगड टाकून तो परिसर प्रतिबंधित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या