Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसप्तश्रृंगी गडावर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही; देवस्थान ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय

सप्तश्रृंगी गडावर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही; देवस्थान ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय

नाशिक | प्रतिनिधी 

साडेतीन शक्तीपीठापैंकी अर्धशक्तीपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

- Advertisement -

आरती आणि पूजेच्या कालावधीत नोंदणी केलेल्या भाविकांना गाभाऱ्यात दर्शन घेण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र, यासाठी पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी नेसूनच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या अंगावर शालदेखील पांघरावी लागणार आहे.

देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश गणेश देशमुख यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, राजेद्र सुर्यवंशी, उन्मेष गायधनी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान मेरकर आदी उपस्थित होते.

येत्या १ जानेवारी २०२० पासून हा निर्णय लागू केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. यादरम्यान, भाविक आणि देवी यांच्यातील नाते अबाधितच राहणार असून देवीच्या पादुकांवर डोके ठेवून नियमित येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येईल. तसेच भाविकांसाठी कुठल्याही प्रकारचे नियम घालण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील विविध देवस्थानाकडून भाविकांना आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करुन देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर आता सप्तश्रृगी गडावर देखील आॅनलाइन दर्शन व भक्तनिवास बुकींगसाठी अ‍ॅप लॉन्च केले जाणार आहे, पहिलाच प्रयत्न असल्याने साधरण १ मार्च पर्यत अ‍ॅपचे काम होण्ाांर असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

तसेच देवस्थानच्या वतीने गडावर भाविकांसाठी महत्वाची कामे केली जात आहेत, भक्तनिवासच्या जुन्या ३६ खोल्याचे नुतनीकरणचे काम सुरु आहे, पहिल्या पायरीवरील दर्शन रांग इमारतीचे काम अंतिम स्वरुपात आले असून नवरात्रात भाविकांचे हाल होणार नाही, यासाठी येथे पंढरपूरच्या धरतीवर काम केले जात आहे. गाभाऱ्याच्या बाजूची खोलीचे काम होणार असून ई निवीदेच्या काढली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या