Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'महाराष्ट्रासाठी हे भूषणावह नाही', फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

‘महाराष्ट्रासाठी हे भूषणावह नाही’, फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई । Mumbai

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची CISF च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. यावरुनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीवरुन राज्यातील सरकार हे पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्ताक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

सुबोध जयस्वाल यांनी केंद्र सरकारनं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंलाचलकपदी नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. ‘पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता राज्यातील पोलीस विभागाचा कारभार सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालंय. त्यामुळं नाराज होऊनच जयस्वाल यांनी प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारनं स्वीकारली,’ असं फडणवीस म्हणाले.

‘पोलीस विभाग हा गृहखात्याच्या अंतर्गत येत असला तरी तो एक स्वतंत्र व स्वायत्त विभाग आहे. गृहमंत्र्यांचं व मुख्यमंत्र्यांचा काम त्यावर देखरेख करण्याचं आहे. हे राज्य सरकारनं समजून घेतलं पाहिजे. मात्र, आता छोट्यातल्या छोट्या बदल्यांपासून प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळंच जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला. ‘पोलिसांच्या मनोधैर्यावर याचा काय परिणाम होईल ही वेगळा भाग आहे. माणसं येत, जात असतात. पण चांगली माणसं अशा प्रकारे घालवणं हे योग्य नाही. महाराष्ट्रासाठी हे भूषणावह नाही,’ असं फडणवीस म्हणाले.

केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या