Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि...; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि…; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | Mumbai

‘आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. ते आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

- Advertisement -

‘आपण सर्वांनी दहीहंडीच्या दिवशीची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष आपण आपलं सरकार आल्यानंतर पाहिला. शुक्रवारी दहीहंडी जोरात आणि आता गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, शिवजयंती जोरात, आंबेडकर जयंती जोरात सगळं जोरात करायचं आहे. आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

तसेच, ‘निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र, असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा,’ असा टोलाही शिवसेनेला लगावला.

‘मुंबईत मागच्या वेळीही आपण चांगली मजल मारली होती. भाजपचा महापौर मागच्याच वेळी बसू शकला असता. मात्र आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पावलं मागे आलो. त्यांना महापौर बनवू दिला. आता मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बसेल. पण ही कुठली शिवसेना ? तर माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिंदेंजीच्या नेतृत्वातली खरी शिवसेना. ती शिवसेना आणि भाजप मिळून महापालिकेवर भगवा फडकवणार त्याशिवाय शांत बसणार नाही’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या