Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयआत्मविश्वासानं भरलेला 'आत्मनिर्भर' भारताचा अर्थसंकल्प, फडणवीसांची प्रतिक्रिया

आत्मविश्वासानं भरलेला ‘आत्मनिर्भर’ भारताचा अर्थसंकल्प, फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई l Mumbai

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पावर बोलतांना म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी खात्यालाही प्राधान्य देण्यात आलं असून हमीभाव उत्पादीत मालाच्या दीडपट देण्याची तरतूद करण्यात आल्याचे सितारमण यांनी सांगितलं. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचं बजेट असल्याचं सांगत, आकडेवारीच जाहीर केलीय. महत्वाकांक्षी, आत्मविश्वासाने भरलेलं आत्मनिर्भर बजेट असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरोनाच्या संकटाचा आणि लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम यंदाच्या अर्थसंकल्पावर होऊ दिला नाही. आरोग्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, नाविन्यता संशोधन व विकास, मिनिमग गव्हर्नमेंट आणि मॅक्झीमम गव्हर्नंन्स या ६ सुत्रांवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय. विविध तरतुदींसह देशाच्या कृषी क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद २०१३-१४ च्या तुलनेत ५ पटींनी वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार असं म्हणणाऱ्या लोकांची तोंडं बंद करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करुन दिली आहे. याशिवाय, स्वत: अर्थमंत्र्यांनी एमएसपीचे जे आकडे दिलेत, त्यावरुन एमएसपीबद्दल ओरडणाऱ्या विरोधकांना आरसा दाखविण्याचं काम त्यांनी केलंय. गव्हाच्या संदर्भात २०१३-१४ मध्ये गव्हाचा एमएसपी दिला होता, ३३ हजार कोटी, जो या वर्षात ७५ हजार कोटी रुपये देण्यात आलाय. तांदुळाचा ६३ हजार कोटी दिला होता, जो आता 1 लाख ७२ कोटी रुपये देण्यात आला. डाळिंबाचा केवळ २३६ कोटी रुपये होता, तो आता १० हजार कोटी रुपये दिला आहे. कापसासाठी ९० कोटी दिले होते, आता २५ हजार कोटी रुपये हमीभाव देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम करण्याचं काम सुरु होतं, ते सरकारने दूर केलंय.

शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी, मायक्रो इरिगेशन सिस्टीमसाठी १० हजार कोटी रुपयाची अभूतपूर्व तरतूद करण्यात आलीय. डेअरी, पोल्ट्री, फिशिंग यासाठीही मोठी तरतूद अर्थसंकल्पात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असून ३० हजार कोटी रुपयांचं तात्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या