Friday, April 26, 2024
Homeनगरविकास बोर्डाच्या ताब्यातील जमिनीवरील अतिक्रमण हटेना

विकास बोर्डाच्या ताब्यातील जमिनीवरील अतिक्रमण हटेना

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व तालुका विकास बोर्डाच्या ताब्यात असलेली कोपरगाव येथील गट न. 19/35 मधील 50 एकर 33 आर क्षेत्रावरील अतिक्रमण हाटविण्याबाबत औरंगाबाद खंडपिठाने आदेश दिला आहे. याबाबत उपविभागीय अधिकार्‍यांचा आदेश पारीत झाला असून तहसिलदारांनी 15 दिवसाच्या आत हे अतिक्रमण हाटविण्यासंदर्भात आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

मात्र आदेश पारीत होवून 15 दिवस संपुन गेले तरीही तहसिलदारांनी याबाबत कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने याचिकाकर्ते बाळासाहेब जाधव यांनी तहसिलदार विजय बोरूडे यांची भेट घेवून सदर अतिक्रमण हटविण्या संदर्भात स्मरणपत्र दिले. बाळासाहेब जाधव यांनी तहसिलदारांना दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे, औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानुसार सदर जमिनीवरील अतिक्रमण हाटविण्यासदर्भात उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी दि. 23 डिसेंबर 2021 रोजी तहसिलदार कोपरगाव यांना आदेश पारीत केला.

त्यामध्ये सदर अतिक्रमण 15 दिवसाच्या आत काढण्याबाबत सुचित करण्यात आले होते. मात्र दि. 7 जानेवारी रोजी ही 15 दिवसांची मुदत संपुष्टात आली आहे. तरीदेखी आपण संबधित महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व तालुका विकास बोर्ड यांचेवर कोणतीही कारवाई केली नाही. वास्तविक उच्च न्यायालयाचा निकाल होवून 6 वर्ष लोटली आहे. आपणास दिलेली 15 दिवसांची मुदतही संपली आहे. तरी आपण लवकरात लवकर सदरची कारवाई करून त्यामधील साईबाबा तपोभूमी मंदिरासह सर्व बांधकामे व शेती असलेली सर्वच मिळकत ताब्यात घ्यावी, अशी विनंती श्री. जाधव यांनी तहसिलदारांना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या