Thursday, April 25, 2024
Homeनाशिकराज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून देवनाचा सिंचन प्रकल्पाला मान्यता

राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून देवनाचा सिंचन प्रकल्पाला मान्यता

येवला l Yeola (प्रतिनिधी)

येथील उत्तर पूर्व भागातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार्‍या देवनाचा सिंचन प्रकल्पाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली.

- Advertisement -

अवर्षण प्रवण असलेल्या उत्तर-पूर्व भागातील अनेक गावांना जलसंजीवनी देणारा देवनाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे साडेबारा कोटी पेक्षा अधिक असल्याने याला राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मंजुरी आवश्यक होती.

या मंजुरीशिवाय पुढील प्रशासकीय मान्यता व व इतर मंजूरही अशक्य असल्याने आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांनी या समितीकडे तसेच अधिकार्‍यांकडे मंजुरीची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी 65 दशलक्ष घनफुट (1840 सहस्त्र घन मिटर ) क्षमतेचे प्रमाण पत्र जलविज्ञान संस्था नाशिक यांनी यापूर्वी दिले आहे. प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील 1800 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.

शिवाय अप्रत्यक्षपणे भारम, कोळम, खु. कोळम बु. रेंडाळे, न्यारखेडे खु. न्यारखेडे बु. वाघाळे या शिवारातील भूजळ पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

तसेच 38 गाव योजनेसारखी पेयजल योजना राबविणे शक्य होणार आहे. तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. सदर प्रकल्प व्हावा यासाठी परिसरातील जलहक्क कृती समितीचा पाठपुरावा सुरू होता.

अनेक गावाचा दुष्काळ हटवणार हा प्रकल्प असल्याने यासाठी थेट मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचीही मदत घेऊन या पुढील काळात हे काम मार्गी लावण्यासह निधी उपलब्ध होऊन काम सुरू करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आमदार दराडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या