Wednesday, April 24, 2024
Homeनगरदेवकौठे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

देवकौठे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावच्या शिवारात सुभाष चंद्रभान आरोटे यांच्या विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुखरुप बाहेर काढल्याने जीवदान मिळाले.

- Advertisement -

देवकौठे येथील सुभाष आरोटे यांच्या शेतातील शंभर फुट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबट्या विहीरीत पडला होता. गुरूवारी सकाळी बिबट्या विहिरीत असल्याचे श्री. आरोटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल श्री. पारेकर, वनपाल डी. व्ही. जाधव, वनपाल एस. बी. ढवळे, वाय. आर. डोंगरे, वनरक्षक एस. एम. पारधी, वन कर्मचारी आर. आर. पडवळे, संतोष बोराडे, श्री. फुलसुंदर यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

प्रसंगी पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, नामदेव कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, अशोक मुंगसे, राजेंद्र मुंगसे, विलास मुंगसे, दादासाहेब मुंगसे, शिवाजी आरोटे, शरद आरोटे यांनी बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. सदर मादी बिबट्यास निंबाळे येथील रोपवाटिकेत हलविण्यात आल्याचे वनपाल वाय. आर. डोंगरे यांनी सांगितले. बिबट्यास बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या